Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांसाठी तुरुंगात जाऊ : कदम

शेतकर्‍यांसाठी तुरुंगात जाऊ : कदम

निफाड । प्रतिनिधी Niphad

भारनियमनाबाबत आम्ही आज शांततेने आलो आहे. मात्र, नियमित वीजपुरवठा केला नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल. महाराष्ट्रातील जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याऐवजी दुसरेच प्रश्न हाताळले जात आहेत. सामान्य नागरिक व शेतकर्‍यांना नियमित वीज द्यायची नसेल तर तसे स्पष्ट सांगा म्हणजे आम्हाला हजारो, लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल. त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी चालेल, असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार अनिल कदम यांनी दिला.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील नियमित वीजपुरवठा करण्याच्या मुद्यावर कदम यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येत्या सोमवारी कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल. आंतरवाली उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी सुधीर कराड, शिवा सुरासे, भाऊलाल कुटे, रतन वडघुले, प्रभाकर मापारी, बंडू अडसरे, रामचंद्र बोडके, आशिष मोगल, सुरेश खैरनार, शरद कुटे या शेतकर्‍यांनी विजेच्या समस्या मांडल्या. त्यानंतर तहसीलदार शरद घोरपडे, महाविरणचे उप कार्यकारी अभियंता नीलेश नागरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, खंडू बोडके, लासलगाव बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे, संजय कुंदे, भाऊ घुमरे, प्रकाश वाटपाडे, भाऊसाहेब शंखपाळ, देवेंद्र काजळे, अभिराज मोरे, नरेंद्र वाटपाडे, किरण निरभवणे, विनायक घोलप, दीपक शिरसाठ, सत्यजित मोर उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या