Saturday, November 23, 2024
Homeनाशिककुशल मनुष्यबळाचा प्रश्न सोडवू

कुशल मनुष्यबळाचा प्रश्न सोडवू

सातपूर । प्रतिनिधी Satpur

आयमा ( AIMA )व एमआयटी पुणे ( MIT Pune )यांच्या संयुक्त प्रयत्नामधून भविष्यात कुशल मनुष्यबळाचा (Skilled manpower ) प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल कराड ( Rahul Karad )यांनी दिले.

- Advertisement -

आयमा रिक्रिएशन सेंटर येथील के. आर. बुब कान्फरन्स हॉल येथे नाशिक उद्योग संस्थांपुढील जागतिक नवीन क्षितिजे आणि तंत्र शिक्षण संस्थांकडून अपेक्षा या विषयावर उद्योजकांना संबोधितांना राहुल कराड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राहुल कराड, आदिती कराड, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, आयमा बीओटी चेअरमन धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सचिव योगिता आहेर, योगेश पाटील आदी होते.

पुण्याच्या एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी आयमा कार्यालयास भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला. नाशिक औद्योगिक वसाहत व एमआयटी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इंजिनीरिंग विद्यार्थ्यांसाठी लवकरच नाशिक येथे कार्यशाळा घेण्यात येणार आहे व एमआयटी शिक्षण संस्थेची शाखा सुरु करण्याबाबत राहुल कराड यांनी चाचपणी केल्याचे समजते. याबाबतीत त्यांनी आयमा पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

समाजात बेरोजगारीचे चित्र दिसत असले तरी आजही कुशल इंजिनीअर व कुशल कामगार यांची कमतरता भासत आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभ्यासक्रम व प्रक्षिशण असावे अशी अपेक्षा आयमा पदाधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केली.

एमआयटी शिक्षण संस्थेची शाखा नाशिकमध्ये सुरु करावी ती काळाची गरज असल्याचे सांगितले. एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी नाशिकमध्ये एमआयटी शाखा सुरु करण्याची ग्वाही देत एमआयटी संस्था व औद्योगिक वसाहत यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिकमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे, यासाठी भरघोस आर्थिक निधी देण्याची ग्वाही राहुल कराड यांनी दिली.

यावेळी कराड यांनी उपस्थितांच्या अनेक शैक्षणिक व औद्योगिक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी आयमांचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी एमआयटी शिक्षण संस्थला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सूत्रसंचलन जगदीश पाटील यांनी केले तर सरचिटणीस ललित बुब यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष एस. एस. आनंद, राजेंद्र अहिरे, राजेंद्र कोठावदे, गोविन्द झा, राहुल गांगुर्डे, हेमंत खोंड, अविनाश बोडके, सुरेश चावला, धीरज वडनेरे, योगेश मोरे, मनीष रावल, विराज गडकरी, देवेंद्र राणे आदी उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या