Monday, March 31, 2025
HomeमनोरंजनVideo : काय सांगता? थ्री-इडियट्स पुन्हा येणार? करीना कपूरने शेअर केला 'तो'...

Video : काय सांगता? थ्री-इडियट्स पुन्हा येणार? करीना कपूरने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मुंबई | Mumbai

2009 साली थ्री इडियट्स (3 Idiots) या चित्रपटाने चाहत्यांना खदखदून हसवले. आजदेखील हा चित्रपट अनेक जण आवडीने बघतात. १४ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाने जवळपास 400 कोटी रुपये कमावले होते…

- Advertisement -

थ्री इडियट्स या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांनी केले. चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor) नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात अभिनेता आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi) यांचा एक फोटो दिसून येत आहे. या फोटोवर ‘इडियट्स’ असे लिहिले आहे.

IMD : नाशिक, धुळे, नंदुरबारसह राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा

व्हिडीओत करीना कपूरने म्हटले आहे की, हे तिघे आमच्यापासून काही तरी लपवत आहेत. कदाचित हे सिक्वेलबाबत विचार करत आहेत. पण हा सिक्वेल माझ्याशिवाय कसा होऊ शकतो? मला याबद्दल बोमन ईराणीसोबत बोलावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना मोठा दिलासा

करीनाने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. थ्री-इडियट्स चित्रपटाच्या मेकर्सने अजून चित्रपटाच्या सिक्वेलबाबत कुठलीही माहिती दिली नाही. मात्र थ्री-इडियट्स पुन्हा येणार का? अशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Anjali Damania on Raj Thackeray : “खरं बोलायला हिम्मत लागते, जी…”;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली....