Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधयोगी आदित्यनाथ होणार मोदींचे वारसदार ?

योगी आदित्यनाथ होणार मोदींचे वारसदार ?

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर – सामुद्रिक मार्तंड 8888747274

योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जुन 1972 साली पांचूर, पौरी गढवाल उत्तर प्रदेश येथे झाला, सध्या त्यांचे जन्म गाव उत्तराखंडमध्ये येते. त्यांचे नावं अजय मोहन बिश्त, त्यांनी गणित विषय घेऊन बहुगुणा विद्यापीठातून पदवी घेतली.

- Advertisement -

वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी घर सोडले व 1990 साली अयोध्येत राम मंदिराच्या चळवळीत भाग घेतला. त्यांच्या राम मंदिर चळवळीच्या दरम्यान गोरखनाथ मंदिराचे प्रमुख पुजारी व महंत अवैद्यनाथ यांच्याशी संबंध आला व योगी आदित्यनाथ त्यांचे शिष्य झाले.

त्याच काळात योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या अजय या नावाऐवजी योगी आदित्यनाथ ह्या नावाने मठामध्ये नामकरण झाले. आदित्यनाथ पुढे गोरखनाथ संस्थांनच्या मठाचे मुख्य अधिपती व महंत अवैद्यनाथ यांचे वारस म्हणून त्यांची निवड झाली….

आदित्यनाथ कायम त्यांच्या जन्म गावाच्या संपर्कात होते, 1998 रोजी त्यांनी त्यांच्या जन्म गावी शाळा स्थापन केली. 12 सप्टेंबर 2014 रोजी त्यांचे गुरु, अवैद्यनाथ महंत यांनी देह ठेवल्यानंतर योगी यांची गोरखनाथ मठाचे प्रमुख महंत म्हणून नेमणूक झाली तसेच नाथ संप्रदायाचे पिठाधीश्वर या सर्वोच्चपदीसुद्धा त्यांची नेमुणूक झाली.

उत्तर प्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. योगी यांचे गुरु अवैद्यनाथ महंत हे हिंदू महासभेचे सक्रिय सभासद होते.

योगी यांची उत्तर प्रदेशमधून लोकसभेचे सदस्य म्हणून 1994 मध्ये निवड झाली. त्यांनी हिंदू युवा वाहिनी नावाची संघटना स्थापन केली. उत्तर प्रदेशमध्ये त्या काळी योगी यांना भाजपाकडून तिकीट मिळाले नाही पण ते निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक होते.

आदित्यनाथ 12 व्या लोकसभेत गोरखपूर येथून सर्वात तरुण खासदार होते, ते पाच वेळेस लोकसभेसाठी निवडून आले.1997 च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचेे स्टार प्रचारक होते. 18 मार्च 2017 रोजी पक्षाने योगी यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून संधी दिली.

आडव्या तिडव्या रेषा नसलेला हात

योगी यांचा हात पहिला की आधी डोळ्यात भरते ते त्यांच्या हाताची जडणघडण. तळहातावरील सर्व ग्रह चंद्र, शुक्र, मंगळ व चारही बोटाखालील गुरु, शनी,रवी व बुध ग्रह उच्च त्यांचे उभार मोठे, तळहातावर कुठल्याही आडव्या तिडव्या रेषा नाहीत हे लक्षण खरोखरच एखाद्या पुण्यवान व्यक्तीच्या हाताचा व ग्रहांचा आकार असावा त्याप्रमाणे अत्यंत शुभ ग्रह हातावर विराजमान आहेत.

तळहाताच्या आकारापेक्षा बोटांची लांबी कमी, अशी स्थिती असता जलद व त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असते.

बोटांवरील पेरे प्रमाणबद्ध लांबीची आहेत, असे असता बोटांच्या पेरांना त्या ग्रहांची तत्वे प्रदान असतात. गुरुचे बोट, ज्ञान महत्वाकांक्षा, शिस्त, कायद्याचे पालन व अध्यात्म प्रदान व नेतृत्व प्रदान करते, शनीचे बोट वृत्ती-प्रवृत्ती व चिकाटी प्रदान करते, रवीचे बोट – कला, लेखन, मान सन्मान दाखविते, बुधाचे बोट- व्यवहार, हुशारी व वक्तृत्त्व दाखविते.

योगी यांच्या हातावरील रेषा व त्यांची स्थाने भाग्यकारक आहेत. रेषा स्पष्ट, पातळ, बारीक असून त्यांचा उगम व शेवट हा अतिशय शुभ प्रकारातला आहे. हातावरील मुख्य रेषापैकी भाग्यरेषा मनगटाचे वर आयुष्य रेषेतून उगम पावत असून ही गोष्ट अतिशय भाग्यकारक असते अशी स्थिती दोन्ही हातावरील असता केलेल्या प्रत्येक कामात व प्रयत्नांना यश लाभत असते.

मस्तक रेषा लांब आहे व ती चंद्र ग्रहावर बारीक होऊन उतरली आहे अशी परिस्थिती असता हे रेषा तीव्र बुद्धी, हुशारी व उत्तम नियोजनाचे गुण प्रदान करते.

हृदय रेषा कमानदार बाक घेऊन गुरु ग्रहावर गेल्यामुळे उत्तम प्रतीचे प्रेम, जिव्हाळा व वात्सल्य प्रदान करते.

रवी रेषा हृदय रेषेनंतर अतिशय शुभ झाली आहे. ती बुध ग्रहाच्या व रवीच्या बोटाच्या पेर्‍यात गेली आहे. रवी रेषेच्या शुभ कारकत्वामुळे मान-सन्मान, कीर्ती लाभते.

आयुष्य रेषा पूर्ण लांबीची व सुदृढ असल्याने उत्साही, निरोगी व आयुष्यमान योगाचा लाभ झाला आहे.

एकंदरीतच अशा शुभत्व प्रदान करणार्‍या हाताचा प्रकार हा भाग्यशाली मानला जातो. त्यासाठी वाडवडिलांचे पुण्य व संचित कामाला येते.

दोन्ही हातावर शुभ लक्षण उच्चीचे ग्रह व रेषा हा दुर्मिळ योग त्यांच्या हातावर आहेत. मोदीजींनंतर पंतप्रधान होण्याचे योग योगी यांना आहेत, असेच ते सुचित करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या