दिल्ली | Delhi
काँग्रेस पक्षात अमूलाग्र बदल करण्याची मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली होती. गेल्या काळातील लोकसभेचा दारुण पराभव व काही राज्यात विरोधी पक्षाने केलेली कुरघोडी यामुळे काँग्रेस पक्ष काही प्रमाणात खिळखिळा झाला आहे. देशातील काही राज्यात कायम (congress) मध्ये राहिलेल्या काही नेत्यांमुळे तर काही जुन्या मित्रांशी आघडीकरून आपली राजकीय विरोधकाची भूमिका निभावत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मधील तब्बल २३ बड्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (congress president soniya gandhi) यांना पत्र लिहून काँग्रेसमध्ये सर्वच स्तरावर अनेक बदल करण्याची मागणी केली असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली होती. (congress 23 leader write letter to soniya gandhi)
या पत्रात म्हंटले आहे की, “भाजपची चांगली प्रगती झाल्याचे मान्य करत देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (pm narendra modi) आकर्षित झाले आहेत. काँग्रेसचा मूळ आधार असलेल्या वर्गाने फिवलेली पाठ आणि तरुणांचा अविश्वास यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिलेला नाही. तसेच पक्षाचा पुनरुद्धार करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक, संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीने विकसित करण्याची गरज” असल्याचे या पत्रात म्हंटले होते. पत्र लिहिलेल्या नेत्यांमध्ये पाच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, विद्यमान खासदार आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. यामध्ये शशी थरूर, गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad), शशी थरुर (Shashi Tharoor) , कपिल सिब्बल (Kapil Sibal), मनिष तिवारी (Manish Tewari), आनंद शर्मा (Anand Sharma), विवेक तनखा(Vivek Tankha), मुकुल वासनिक (Mukul Wasnik), जितीन प्रसाद (Jitin Prasada), भूपिंदर सिंग हूडा (Bhupinder Singh Hooda), राजेंद्र कौर भट्टल (Rajender Kaur Bhattal), एम वीरप्पा मोईली (M Veerappa Moily), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), पीजे कुरिन (PJ Kurian), अजय सिंह (Ajay Singh), रेणुका चौधरी (Renuka Chaudhary), मिलिंद देवरा (Milind Deora), राज बब्बर (Raj Babbar), अरविंद सिंग लवली (Arvinder Singh Lovely), कौल सिंग ठाकूर (Kaul Singh Thakur), अखिलेश प्रसाद ठाकूर (Akhilesh Prasad Singh), कुलदीप शर्मा (Kuldeep Sharma), योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) आणि संदीप दिक्षित (Sandeep Dixit) या नेत्यांचा समावेश आहे.
या सर्व दिग्गजांनी पत्र लिहिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील या पत्राची तात्काळ दखल घेत म्हंटल्या की, “आपण पक्षाचे अध्यक्ष पद सोडायाला तयार असून आपण सर्वांनी एकत्रित येऊन नवीन अध्यक्षाची निवड करावी.” त्यासाठी त्यांनी २४ ऑगस्ट रोजी बैठक देखील बोलावली.
काही दिवसापूर्वी कॉंग्रेस मधील युवा विरुद्ध जेष्ठ असा संघर्ष देखील पाहायला मिळाला. युवा विरुद्ध जेष्ठ यांच्यातील संघर्षामुळे मध्यप्रदेशमधील कॉंग्रेस (madhyapradesh congress goverment) सरकार कोसळले. तसेच राजस्थानमधील अनेक राजकीय घडामोडीमुळे (rajsthan crisis)राजस्थानमधील सरकार अल्पमतात आले होते. मात्र प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांनी मध्यस्ठी करून गेहलोत-पायलट वाद मिटवला. आणि राजस्थानातील सरकार स्थिर केले. राहुल गांधी (Rahul gandhi) देखील काही दिवसापासून सातत्याने मोदी सरकारवर निशाना साधत आहे. करोनाच्या काळात संचारबंदी दरम्यान अनेक पायी घरी जाणार्याचा मुद्या, चीन–भारत तणावपूर्ण संबंध(india-chaina), देशातील बेरोजगारी (unemployment), वाढलेले इंधनच्या किमती, करोना (covid19) परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश आणि नुकत्याच फेसबुक व भाजपा संबंध (facebook and bjp relation) या मुद्यावरून सरकारवर टीका करण्याची एकही संधी कॉंग्रेस नेते राहुल (congress leader Rahul Gandhi) गांधी सोडत नाहीये. राहुल गांधी यांना देखील काही राज्यातील युवा नेतृत्वाची साथही मिळत आहे. प्रियांका गांधी यांचे उत्तरेत प्रस्थ वाढत आहे. प्रियांका गांधी देखील सातत्याने योगी आदित्यनाथ(yogi adityanath) सरकारवर टीका करत आहे. यासर्व घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल गांधी यांची वाढलेली आक्रमकता, प्रियांका गांधी यांचे उत्तरेत वाढते प्रस्थ तसेच २३ बड्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र आणि सोनिया गांधी यांनी तात्काळ पत्राला उत्तर देणे यामुळे कॉंग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार की २०२४ मध्ये होणार्या देशाच्या निवडणुकांची तयारी हे येणारा काळच ठरवेल.