Sunday, June 23, 2024
Homeनगरवाईन विक्रीबाबतचा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास आंदोलन

वाईन विक्रीबाबतचा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास आंदोलन

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय भावी पिढीचे नुकसान करणारा असून तो तातडीने रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना भारतीय जनसंसदच्या कार्यकर्त्यांनी दिले.

निवेदन देताना भारतीय जनसंसदचे रामराव भदगले, कारभारी गरड, प्रा. नानासाहेब खराडे, डॉ. अशोकराव ढगे, डॉ. करणसिंह घुले, डॉ. विद्या कोलते, कल्याणराव मुरुमकर, संजय वाघमारे, भैरवनाथ शेजुळ, रंगनाथ डुकरे, हरीश चक्रनारायण, रावसाहेब साठे, बाळू डोंगरे, बाबासाहेब कणगरे, शिवाजी भारस्कर व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य शासन शेतकरीहित डोळ्यासमोर ठेवत निर्णय घेतल्याचे म्हणत असले तरी यातून किती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे हा प्रश्नच आहे. काही शेतकर्‍यांना लाभ मिळेलही परंतु किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळू लागल्यास शालेय मुले, युवक, तरुण, महाविद्यालयातील मुले, मुली वाईनच्या आहारी जातील. त्यामुळे आर्थिक, शारीरीक सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन पिढी बरबाद होऊ शकते. म्हणून राज्य सरकारने तातडीने किराणा दुकान व सुपर मार्केट मधुन वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा. तसे न झाल्यास तालुक्यात आंदोलन करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या