Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रWinter Session 2023 : राज्याचं हिवाळी अधिवेशन १० दिवसात गुंडाळणार? तात्पुरतं वेळापत्रक...

Winter Session 2023 : राज्याचं हिवाळी अधिवेशन १० दिवसात गुंडाळणार? तात्पुरतं वेळापत्रक जाहीर

मुंबई | Mumbai

हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यंदा ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. हिवाळी अधिवेशानाचे हे तात्पुरचे वेळापत्रक असून, २० डिसेंबरपर्यंतच्या कामकाजाची नोंद यात करण्यात आलीये.

- Advertisement -

दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते. मात्र यावेळी तात्पुरत्या अधिवेशनाच्या वेळापत्रकात शुक्रवारीच अधिवेशन गुंडाळल्याचं दिसतंय. त्यामुळे या कामकाजाला पुढील दोन दिवसांची कात्री लावली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु झाली आहे. नाशिक-पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेलं नुकसान याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या