Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजनआदिपुरुषच्या लेखकाने मागितली बिनशर्त माफी ; काय म्हणाले वाचा सविस्तर

आदिपुरुषच्या लेखकाने मागितली बिनशर्त माफी ; काय म्हणाले वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

बिग बजेट असलेला चित्रपट आदिपुरुष (Adipurush Controversy) रिलीज होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटातील स्टारकास्टचा लुक, त्यांचे डायलॉग, व्हिएफेक्स आदींवर चौफेर टिका करण्यात येत होती. एकूणच चित्रपटाच्या सगळ्याच गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान आता चित्रपटाचे लेखक यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे मनोज मुंतशिर (Manoj Muntashir) यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर (Social Media Post) करत माफी (Apology) मागितली आहे.

- Advertisement -

मनोज मुंतशीर यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘आदिपुरुष चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय व्यक्ती आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो, तसेच एक आणि अटूट राहण्याचे आणि आपल्यात पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!

मनोज मुंतशीर यांनी माफी मागितताच हे ट्विट व्हायरल झाले. त्यांच्या या ट्विटवर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, ‘संवाद लिहिण्यापूर्वी विचार करायला हवा होता.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्ही संधीसाधू आहात.’ तर काहींनी ‘तुम्ही आमच्या माफीला पात्र नाही’ असे लिहून प्रतिक्रिया दिली. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘खूप उशीर झाला आहे. जेव्हा चित्रपट फ्लॉप झाला, तुमच्याकडे जेव्हा गमावण्यासारखे काही उरले नाही, जेव्हा जनतेचा राग स्वतःहून थंड झाला, तेव्हा तुम्ही माफी मागत आहात. हे काम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच व्हायला हवे होते, पण तेव्हा तुम्ही चित्रपटाचे कलेक्शन मोजण्यात आणि चित्रपटाचा बचाव करून जखमेवर मीठ चोळण्यात व्यस्त होता. आता चित्रपटाची कमाई पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे माफी मागत आहात.’

डॉ. प्रदीप कुरुलकरांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

दरम्यान, आदिपुरुष सिनेमाचा वाद थेट कोर्टात गेला होता, अलाहाबादमधील लखनऊ पिठाने तीन दिवस आदिपुरुष खटल्यावर सुनावणी घेतली होती. पहिल्या दिवसापासून कोर्टाने वेगवेगळ्या गोष्टींवरुन आदिपुरुषच्या टीमला धारेवर धरले होते. चित्रपटामध्ये भगवान राम, हनुमान आणि सीता यांना ज्याप्रकारे दाखवण्यात आले आहे त्यावरुन निर्मात्यांना समाजात काय मेसेज द्यायचा आहे, हे त्यांनी सांगावे. हे सगळे करुनही निर्माते म्हणतात की हे रामायण नाही…ते प्रेक्षकांना वेड्यात तर काढत नाही ना असा प्रश्नही कोर्टाने केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या