Monday, May 27, 2024
Homeजळगावशेतमाल प्रक्रिया सह. संस्थेच्या चेअरमनपदी सोपान पाटील यांची निवड

शेतमाल प्रक्रिया सह. संस्थेच्या चेअरमनपदी सोपान पाटील यांची निवड

रावेर|प्रतिनिधी raver

येथील रावेर तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सोपान पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आय.बी. तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

- Advertisement -

यावेळी संस्थेचे संचालक मुरलीधर तायडे, धनजी लढे,जिजाबराव चौधरी,किशोर पाटील, दिलीप पाटील,वाय.व्ही.पाटील,लक्ष्मण मोपारी,ईश्वर निळे,सौ. छायाताई महाजन,शकुंतला महाजन उपस्थित होते.यावेळी संचालकांनी ही निवड ५ वर्षासाठी असल्याचे जाहीर केले.नवनिर्वाचित चेअरमन सोपान पाटील यांचे माजी नगराध्यक्ष रमेश महाजन,ज्ञानेश्वर महाजन, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील,विवरे बुद्रुक विकासो चे व्हा.चेअरमन विलास सपकाळ यांनी अभिनंदन केले. निवडीसाठी संस्थेचे मॅनेजर नंदलाल वाणी, कर्मचारी सीताराम महाजन यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या