Monday, June 24, 2024
Homeनाशिकश्रींच्या आगमनासोबतच विसर्जनाच्या नियोजनासाठी मनपा सज्ज

श्रींच्या आगमनासोबतच विसर्जनाच्या नियोजनासाठी मनपा सज्ज

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या आगमनासह नाशिक महानगरपालिकेने विसर्जनाची तयारीदेखील सुरू केली आहे. एकीकडे गणेश मंडळांना परवानगी देण्यासह विसर्जन मिरवणुकीचे नियोजन सुरू केले असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने विसर्जनासाठी २७ नैसर्गिक, तर ५६ कृत्रिम तलावांची यादी जाहीर केली.

फिरते विसर्जन टॅक

पीओपी सह सर्वच श्रींच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन पर्यावरण विभागाने केले आहे.त्यादृष्टीने नियोजन करताना महानगरपालिकेकडून ’टँक ऑन व्हिल्स’ ही नवी संकल्पना रयाबवण्यात येणार आहे. या माध्यमातून फिरते विसर्जन टँक च्या माध्यमातून ठिकठिकारी श्री मुर्तींचे विसर्जन करण्याचा मानस आहे.

शहरात कुठे असणार विसर्जनस्थळे

पंचवटी – राजमाता मंगल कार्यालय, म्हसरूळ सितासरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझरतलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा.

पूर्व विभाग – लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, मनपा एसटीपी परिसर- आगर टाकळी, नासर्डी-गोदावरी संगम.

पश्चिम विभाग – यशवंत सिद्धेश्वर मंदिर, घारपुरेघाट, महाराज पंटागण,रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, हनुमान घाट.

नवीन नाशिक विभाग – पिंपळगाव खांब वालदेवी घाट.

सातपूर विभाग– गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशीपूल, मतेनर्सरी पूल.

नाशिकरोड विभाग – चेहडीगाव नदीकाठ, जॉगिंग ट्रॅकसमोर.

पंचक विभाग – गोदावरी नदी, स्वामी जनार्दन पुलालगत, दसक गाव नदीकाठ, वालदेवी नदीकाठ

देवळाली गाव परिसर – , विहीतगाव, वालदेवी नदीकाठ.

कृत्रित तलावांचे नियोजन

नाशिक पूर्व – लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामी नगर लेन-१ बस स्टॉपजवळ, नासर्डी- गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर, राणेनगर, कलानगर चौक ट्रैकशेजारी. राजसारथी सोसायटी.

सातपूर – शिवाजीनगर सुर्यामर्फी चौक, अशोकनगर पोलिस चौक, नासर्डी नदी, नासर्डीपूल, अंबड-लिंकरोड, आयटीआय पूल, सातपूर, पाइपलाइनरोड, आसाराम बापू पुलमागे गोदापार्क, चव्हाण कॉलनी, परीचीबाग, पंपिंग स्टेशनजवळ, फॉरेस्ट नर्सरीपूलजवळ, गंगापूररोड, बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा, दोंदेपूल, उंटवाडी म्हसोबा मंदिराजवळ

नाशिकरोड – महापालिका शाळा नासर्डीपूल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, पालिकाबाजार, लायन्स क्लब मैदान, पंडित कॉलनी महापालिका कार्यालयासमोर, शितळादेवी मंदिरासमोर टाळकुटेश्वर मंदिर.क्र १२५ मुक्तिधाम, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, महापालिका क्रीडांगण चेहडी पंपिंग श्रमिकनगर पुणे रोड, नारायणबापू नगर चौक जेलरोड, राजराजेश्वरी चौक, गाडेकर मळा देवळालीगाव, के. एन. केला विद्यालय,

पंचवटी – राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर-मानूर, कोणार्कनगर, तपोवन, प्रमोद महाजन गार्डन, सरस्वती नगर, रामवाडी जॉगिंग,पश्चिम- चोपडा लॉन्स

नविन नाशिक- गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ, जुने सिडको, पवननगर, जुलकुंभ हिरे शाळेजवळ सिडको, राजे संभाजी स्टेडियम, सिंहस्थनगर, मीनाताई ठाकरे शाळा, कामटवाडे, डे-केअर शाळा रामनगर, राजीवनगर

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या