Saturday, July 27, 2024
Homeजळगावआमदारांचे निलंबन रद्द झाल्याने भाजपाकडून आनंदोत्सव

आमदारांचे निलंबन रद्द झाल्याने भाजपाकडून आनंदोत्सव

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) संविधानाचा गैरवापर करीत भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन (Suspension of MLAs) केले. हे चुकीचे आहे. मविआच्या या कारवाईविरोधात 28 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे फटाखे फोडून व लाडू वाटप करून आनंद उत्सव (Anandotsav) साजरा केला. याप्रसंगी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांना लाडू भरविला.

- Advertisement -

यावेळी प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नगरसेवक राजू मराठे,विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, अरविंद देशमुख, गणेश माळी, मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, संजय लुला, ग्रामीणचे संजय भोळे, आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, सना जहांगीर खान, हेमंत जोशी, आनंद सपकाळे, प्रभाकर तायडे, संजय मोरे, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, युवा मोर्चा अजय रडे, मिलींद चौधरी, किशोर वाघ, जयंत चव्हाण, भूषण जाधव, भूषण भोळे, शुभम पाटील यांच्यासह मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.राजूमामा भोळे म्हणाले की आम्ही न्यायालयात गेलो, आमची बाजू मांडली, आमची बाजू बरोबर होती. विधानसभागृहात कोणतेही वाद झाले नाहीत, झाले ते कॅबीनमध्ये झाले, मी स्वतः आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने तेथे उपस्थित होतो. मविआ सरकारला अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची होती. त्यात भाजपा आमदारांची संख्या कमी कशी करता येईल या दूषित हेतूने त्यांनी आमदारांचे निलंबन केले. शेवटी सत्यमेव जयते या न्यायानुसार सत्याचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न, शेतकर्‍यांच्या समस्या, आत्महत्या,एसटी कर्मचार्‍यांंचा संप आदी समस्या सोडविण्यास वा सर्वसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, केवळ अधिकार्‍यांच्या बदल्या, वसुलीमध्येच स्वारस्य असल्याची टीका आमदार भोळे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या