Monday, May 27, 2024
Homeनाशिकमंदिरातील साहित्य व दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला अवघ्या १२ तासांत बेड्या

मंदिरातील साहित्य व दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला अवघ्या १२ तासांत बेड्या

इगतपुरी । प्रतिनिधी

इगतपुरी शहरात (Igaptur City) एकाच रात्रीत तीन ठिकाणांच्या मंदिरातील पुजेचे साहित्य व दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या भुरट्या चोराला अवघ्या १२ तासांत पकडण्यात इगतपुरी पोलीसांना यश आले असुन मंदिरातील भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

शहरातील नेहरूचौक भागातील तीनलकडी पुला जवळील श्री बालाजी मंदीर, बजाज भवन जवळील शितलामाता मंदीर, बाजारपेठ मधील नयन हॉटेलचे पाठीमागील शिवमंदिर या ठिकाणी पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंदिरांचे दरवाजाचे टाळे उचकटून आत प्रवेश करुन मंदिरातील दान पेटी तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम व मंदिरातील पितळी व चांदीचे धातूचे पूजेची भांडी, समई, घंटा चोरी केली होती.

Nashik News : चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; गुन्हा दाखल

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच घटना ठीकानाचा पंचनामा करीत पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी तपासाचे चक्र फीरवित फिर्यादीच्या माहिती आधारे युक्ती लावुन शहरात फेरफटका मारीत चोरट्यचा तपास लावुन संशयीत आरोपी निलेश भास्कर बोराडे, वय ३३ वर्ष मूळ रा. वावी हर्ष त्र्यंबकेश्वर, हल्ली रा. श्रीरामवाडी घोटी या जिल्हा स्तरीय पुरस्कार पटकवलेल्या सायकलस्वार पटुला अवघ्या १२ तासात अटक केली.

संशयीत बोराडे याने चोरीच्या गुन्हयात कबुली दिली असुन त्याच्याकडून मंदिराचा सर्व मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. पोलीसी खाक्या दाखविताच आरोपीने चौकशीत त्याने घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक चोरी केल्याचे गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर घोटी येथे आणखी एक मंदीरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील तळोशी येथील मंदिरावरील कळस चोरीचा गुन्हा ही या तपासात उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.

Raj Thackeray : “…म्हणून सगळेजण टुणकन तिकडे गेले”; अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरेंचा हल्लाबोल

चोरीच्या घटनेतील आरोपीला पकडण्यात कोणताही विलंब न लावता अवघ्या १२ तासात तपास करून मुद्देमाल हस्तगत करून पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे केलेल्या कामगीरीचे शहरात व पोलीस अधिकारींनी कौतुक करीत अभिनंदन केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस कर्मचारी प्रकाश कासार, अभिजित पोटींदे, राहुल सहाणे, विजय रूद्रे, जे. डी .परदेशी, निलेश देवराज करीत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या