Saturday, May 18, 2024
Homeनाशिकअहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government )महिला व बालविकास विभागामार्फत (Woman And Child Welfare Department) महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (Punyashlok Ahilyadevi Holkar Award) दिला जातो. सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या वर्षांकरीता सदर पुरस्कारासाठी पात्र महिला व संस्थांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिकचे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी सुनिल दुसाने यांनी केले आहे.

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दरवर्षी राज्यस्तर, विभाग स्तर व जिल्हा स्तरावर दिला जातो. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात २५ वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव आवश्यक आहे. अशा क्षेत्रात काम केलेल्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप रूपये एक लाख एक रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थांना महिला व बाल विकास क्षेत्रात १० वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव आवश्यक आहे. विभागस्तरीय पुरस्काराचे स्वरूप रूपये २५ हजार एक रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिलांसाठी महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षाचा कार्याचा अनुभव आवश्यक आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप रूपये १० हजार एक रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

विहित नमुन्यातील अर्जासाठी इच्छुक पात्र महिला व संस्थांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय,नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड येथे संपर्क साधावा व परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलै २०२३ पुर्वी शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयात सादर करावेत, असेही दुसाने यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या