Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : हॉटेलच्या उद्घाटनासाठी बोलावून अत्याचार

Crime News : हॉटेलच्या उद्घाटनासाठी बोलावून अत्याचार

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची महिलेला धमकी || एका विरुद्ध गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

हॉटेलच्या उद्घाटनासाठी बोलावून महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा तसेच फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी किसन महादेव आव्हाड (रा. जांभळी, ता. पाथर्डी, सध्या रा. पाथर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया परिचारिका असून, दोन-तीन वर्षांपूर्वी तिची आव्हाड याच्याशी ओळख झाली होती. 22 फेब्रुवारी रोजी हॉटेलच्या उद्घाटनासाठी तिला बोलावून आव्हाड याने कारमधून हॉटेलवर नेले. कार्यक्रमानंतर इतर लोक निघून गेल्यावर हॉटेलचे शटर बंद करून धमकावत अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला.

- Advertisement -

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने फिर्यादीत नमूद केले. मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला. भीतीपोटी यापूर्वी कोणालाही माहिती दिली नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिच्या जबाबावरून पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

मुंढे इफेक्ट फक्त किचनमध्ये नको, एफडीएच्या कार्यालयातही दिसावा; संजय राऊतांचे तुकाराम...

0
मुंबई । Mumbai आपल्या शिस्तबद्ध आणि कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे...