Monday, June 17, 2024
Homeक्राईमआंबी दवणगाव येथे महिलेस मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

आंबी दवणगाव येथे महिलेस मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

तुमची मोटारसायकल काढून घ्या, ती आमची शेळी बांधण्याची जागा आहे. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी पती-पत्नी व मुलाला काठी, चप्पल व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील आंबी दवणगाव येथे घडली आहे. मिरा सुरेश माळवदे, (वय 50) या राहुरी तालुक्यातील आंबी दवणगाव येथे राहत असून त्यांचा भाया बाबासाहेब भानुदास माळवदे हा शेजारीच त्याच्या कुटुंबासह राहतो. शेतीचे वाटप करणेवरून त्यांच्यात वाद आहे.

मिरा माळवदे या घरासमोरील जागेत शेळी बांधण्यासाठी गेल्या असता त्याठिकाणी मोटारसायकल लावलेली होती. तेव्हा मिरा माळवदे त्यांना म्हणाल्या, तुमची मोटारसायकल काढून घ्या. असे म्हणाल्या असता आरोपी त्यांना शिवीगाळ करू लागले. तेव्हा मिरा माळवदे यांचे पती व मुलगा भांडण सोडविण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांना चप्पल, लाकडी काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. मिरा सुरेश माळवदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब भानुदास माळवदे, किरण बाबासाहेब माळवदे, भागीरथ बाबासाहेब माळवदे, अलका बाबासाहेब माळवदे यांच्यावर गु.र.नं. 600/2024 भादंवि कलम 323, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या