Sunday, September 29, 2024
Homeधुळेधुळ्यात महिलेचा जळून मृत्यू

धुळ्यात महिलेचा जळून मृत्यू

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील चितोड रोडवरील सुदर्शन कॉलनीत एका महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना दि.30 जून रोजी दुपारी लक्षात आली. याबाबत धुळे शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

रेखाबाई गोपाल शिगले (वय 34 रा. सुदर्शन कॉलनी, चितोडरोड, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा जयेश याने पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, दि.30 जून रोजी आई रेखाबाई शिगले व काका संदीप विसपुते यांच्यासह आईच्या उज्जैन येथील माहेरी जाण्याचे ठरले. मात्र आईने काका व तु आधी शिरपूर येथे पोहचा, त्यानंतर मी येते, असे सांगितले. त्यानुसार काकांसह शिरपूर येथे एस.टी.बसने पोहचल्यावर काकांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आई घरून निघाली का, असे विचारण्यासाठी फोन केला असता, आईने मी तयारी करत आहे, तयारी करून निघत आहे, असे सांगीतले. शिरपूर बसस्थानकावर सव्वापाच वाजता पोहचल्यावर मित्र जयेश नरवाडे याने तुमच्या घराच्या मागील बाजूस भिंतीजवळ एक बाई जळून निपचित पडलेली असल्याचे सांगितले.

त्यानंतर आईशी मोबाईलवर संपर्क साधला असता आई फोन उचलत नव्हती. घराजवळील वंदना, पोना.वसावे, बंटी जाधव, विवेक देशपांडे यांनी तुमच्या घराला कुलूप लावले असून घराच्या मागे भिंतीजवळ एक बाई जळून पडल्याचे सांगितले. त्यानंतर शिरपूर येथुन काली-पीली वाहनाने पुन्हा धुळे शहर गाठण्यासाठी निघालो असता आनंद पाटील या मित्राचा फोन आला. त्याने सोनगीर टोल नाक्याजवळ उतरा आपण कारमध्ये सोबत जावु असे सांगितले. त्यानंतर सोनगीर टोलनाक्यावर आनंद पाटील आल्यावर त्याच्यासोबत हिरे मेडिकल येथे सायंकाळी साडेसात वाजता पोहचलो. दरम्यान, जयेश नरवाडे याने मोबाईलवर पोलीस आल्याचे सांगत ती बाई तुझी आईच असल्याचे व रूग्णवाहिकेने मृतदेह हिरे मेडिकल येथे नेल्याचे सांगितले. तेथे डॉ.नागे यांनी तपासणी मृत घोषित केले होते. या माहितीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय डी.डी.धनवटे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या