Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमभरदिवसा महिला दुकानदाराचे दागिने ओरबडले

भरदिवसा महिला दुकानदाराचे दागिने ओरबडले

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कोरेगाव येथे शिवदत्त किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानांमध्ये भर दिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी पाण्याची बॉटल खरेदी करण्याचे निमित्त करत महिला दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

- Advertisement -

घटनेबाबत माहिती अशी, कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील श्री दत्त किराणा अ‍ॅड जनरल स्टोअर्स या दुकानांमध्ये मंगळवारी (दि.3) दुपारी चार वाजता रोहिणी रवींद्र शेळके या महिला दुकानदार दुकानामध्ये होत्या. त्यावेळी दुचाकीवर दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुकानामध्ये आले. त्यांनी पिण्याच्या पाण्याची बॉटल मागितली. पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी चोरट्याने पन्नास रुपये दिले. सुट्टे पैसे परत देत असताना चोरट्याने रोहिणी शेळके यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडले आणि साथीदाराच्या गाडीवर बसून पळून गेला.

YouTube video player

ही घटना घडताच महिला दुकानदार शेळके यांनी जोरजोरात आरडाओरड केली. यावेळी दुकानाच्या बाहेर एक वृद्ध आजी बसल्या होत्या. त्या देखील ओरडल्या. आवाजाने आसपासचे नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञात चोरट्यांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानचे चालक रवींद्र शेळके हे कर्जत येथे काही कामानिमित्त आलेले असताना ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...