नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa
देवगड दर्शन (Devgad Darshan) करुन नगरला जाताना संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील (Sambhaji Nagar-Ahmednagar Highway) हॉटेलमध्ये नाष्टा करण्यास थांबलेलया महिलेच्या गळ्यातील 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे (Gold) मिनी गंठण बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घ्या
याबाबत सुमन ज्ञानेश्वर इंगळे (वय 40) धंदा-घरकाम रा. मधुबन कॉलनी जुना जालना यांनी नेवासा पोलीस ठाण्यात हजर होवुन लेखी फिर्याद दिली की, 28 ऑक्टोबर रोजी मी माझे नातेवाईकांसह आळंदी येथे देव दर्शन करण्यासाठी निघालो असता नगर हायवे वरील हॉटेल काळे बंधु ता. नेवासा समोर संभाजीनगर ते नगर जाणारे रोडलगत सकाळी 10:30 वाजेचे सुमारास नाष्टा करून आम्ही आमचे गाडीत बसण्याचे तयारीत असताना पाठीमागुन एक बजाज पल्सर विना क्रमांकाचे गाडीवरील दोन अनोळखी इसम माझे पाठीमागे येऊन त्यातील काळे जर्किंग घातलेला इसम याने माझ्या पाठीमागून हात घालुन माझे गळ्यातील मिनी गंठण बळजबरीने ओरबाडून घेऊन त्याचे सोबत पिवळा शर्ट घातलेला अनोळखी इसम हा त्याचेकडील बजाज पल्सर मोटारसायकलवर नगरच्या दिशेने जोरात निघुन गेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) भारतीय दंड विधान कलम 392 प्रमाणे रस्तालुटीचा गुन्हा दाखल (Filed a Case) आहे.
झेडपीच्या आणखी तीन संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीरसर्वपक्षीय नेत्यांच्या संदर्भात उपहासात्मक वाक्याचे रस्त्यावर फ्लेक्स बोर्ड