Saturday, April 26, 2025
HomeनगरAccident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

करंजी | वार्ताहर

पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळील कान्होबावाडी फाटा येथे देवराई कडून करंजीकडे पायी प्रवास करत असलेल्या महिलेला शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा :  संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…

अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव कमल अशोक लंबे (रा. बगडी ता-गंगापूर जि-छत्रपती संभाजीनगर) येथील असून अपघात घडल्यानंतर करंजी पोलीस औट पोस्टचे सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी,भगवान टकले यांनी घटनास्थळी जाऊन या महिलेचा मृतदेह पाथर्डी येथे शवविच्छेदनासाठी रवाना केला.

हे ही वाचा : आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याचा मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाचा मृत्यू

या महिलेसोबत इतर कोणीही नसल्यामुळे या महिलेची शुक्रवारी सायंकाळी ओळख पटली. त्यानंतर साकेगाव तालुका पाथर्डी येथील या महिलेच्या नातेवाईकांनी बगडी तालुका गंगापूर या ठिकाणी महिलेच्या कुटुंबांना कळवले व त्यानंतर या महिलेचा मृतदेह कुटुंबियाकडे स्वाधीन करण्यात आला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी, भगवान टकले करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...