Thursday, June 13, 2024
Homeनगरमहिला डॉक्टरला मारहाण करून डोळ्यात मिरची पुड फेकली

महिला डॉक्टरला मारहाण करून डोळ्यात मिरची पुड फेकली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

महिला डॉक्टरला मारहाण करून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकल्याची घटना कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर येथील एका क्लिनिकमध्ये सोमवारी (दि. 18) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. कल्याण रस्ता परिसरात राहणार्‍या महिला डॉक्टरला मारहाण झाली आहे.

त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या क्लिनिकमधील पार्टनर डॉक्टरच्या पत्नीसह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांच्या क्लिनिक मध्ये असताना त्यांच्या क्लिनिक मधील पार्टनर डॉक्टरची पत्नी व एक अनोळखी व्यक्ती क्लिनिक मध्ये घुसले.

पार्टनर डॉक्टरला मेसेज व फोन करण्याच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली. अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचा मोबाईल जमीनीवर आपटून नुकसान केले. तसेच पार्टनरच्या पत्नीने मिरची पुड डोळ्यात फेकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या