Friday, April 24, 2026
HomeनगरCrime News : विवाहितेचा पैशासाठी सासरी छळ; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : विवाहितेचा पैशासाठी सासरी छळ; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

देवगड फाटा (ता. नेवासा) येथील रहिवासी व सध्या अहिल्यानगर शहरात राहत असलेल्या 26 वर्षीय महिलेने आपल्यावर झालेल्या सासरच्या मानसिक व शारीरिक छळाबाबत सात जणांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुरूवारी (26 जून) फिर्याद दिली.

- Advertisement -

पोलिसांनी पीडितेचा पती चरण ऊर्फ किरण अशोक मिसाळ, सासु सुमन अशोक मिसाळ, सासरे अशोक यशवंत मिसाळ, दीर नवनाथ अशोक मिसाळ, किरण अशोक मिसाळ, जाऊ मनिषा नवनाथ मिसाळ, वैशाली किरण मिसाळ (सर्व रा. मिसाळ वस्ती, देवगड फाटा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या सध्या सिध्दार्थनगर, साठे चौक येथे राहतात.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे 16 मे 2017 रोजी चरण उर्फ किरण अशोक मिसाळ याच्याशी विवाह झाला होता. सुरूवातीच्या पाच महिन्यांमध्ये सासरी व्यवस्थित नांदवल्यानंतर, पती चरण याने त्यांच्याकडे माहेरून 50 हजार रूपये आणण्याची मागणी केली. परंतु माहेरची हलाखीची परिस्थिती असल्याने पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीसह इतर नातेवाईकांनी फिर्यादीचा छळ सुरू केला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सासू सुमन मिसाळ हिने डिसेंबर 2017 मध्ये त्यांना माहेरी आणून सोडले. यानंतर सहा महिने कोणीही विचारपूस न करता संपर्कही साधला नाही. जून 2018 मध्ये उर्मिला यांनी स्वतःहून सासरी जाण्याचा प्रयत्न केला असता, सुरूवातीला काही काळ व्यवस्थित वागवून नंतर पुन्हा पैशांसाठी त्रास दिला जाऊ लागला. गर्भवती असतानाही त्यांच्यावर अमानुष वागणूक होत होती.

फिर्यादीने जुलै 2019 मध्ये पुन्हा एकदा सासरच्या छळामुळे माहेरी परत यावे लागले. डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र त्या काळातही सासरच्या कोणत्याही सदस्यांनी विचारपूस केली नाही असे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

IPL 2026 : चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार की ‘डेडलॉक’ सुटणार?...

0
बेंगळुरू । Bengaluru आयपीएल २०२६ चा थरार आता रंगात आला असून, आज क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आयटी सिटी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खिळल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स...