Thursday, May 15, 2025
Homeक्राईममहिलेचे तीन तोळ्यांचे मिनी गंठण लंपास

महिलेचे तीन तोळ्यांचे मिनी गंठण लंपास

नाशिक ते नगर बस प्रवासात घडली घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

बस प्रवासात महिलेची पर्स एका महिलेने चोरून नेली. त्यात तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण व तीन हजार रुपयांची रोकड होती. नाशिक ते अहिल्यानगर बस प्रवासादरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली हरिभाऊ कपाळे (वय 43 रा. मखबलाबाद शांतीनगर, स्वास्तिक रेसिडेन्सी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व त्यांची मुलगी माहेरी अहिल्यानगर येथे येण्यासाठी नाशिक येथून मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता नाशिक ते अकलोज या बसमध्ये बसल्या होत्या. दुपारी पावणे बाराच्या सुमारास बस राहुरी येथे आल्यानंतर तेथून तीन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या व त्यातील एक महिला फिर्यादीच्या शेजारी येऊन बसली. दुपारी साडेबारा वाजता बस अहिल्यानगर शहरातील सावेडी नाका येथे आली असता फिर्यादी व त्यांची मुलगी बस मधून खाली उतरली. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेली महिला देखील तेथे उतरली.

दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्याकडील पर्स पाहिली असता त्यांना पर्स दिसली नाही. त्यांनी बसमध्ये जावून पाहिले असता तेथे देखील पर्स मिळून आली नाही. त्यांच्यासोबत बस मधून उतरलेली महिला मात्र रिक्षातून निघून गेली. त्या महिलेने फिर्यादीची पर्स व त्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि तीन हजार रुपयांची रोकड चोरून नेली असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) अज्ञात महिलेविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...