Wednesday, October 21, 2026
Homeक्राईमCrime News : गर्दीचा फायदा घेत महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लांबवले

Crime News : गर्दीचा फायदा घेत महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लांबवले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्वस्तिक बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढताना एका महिलेचे गर्दीचा फायदा घेत साडेतीन लाख रुपयांचे सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैशाली देवीदास कसाळ (वय 34, मूळ रा. अंतरवली ता. शेवगाव, सध्या रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्या शुक्रवारी (24 जुलै) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्वस्तिक बसस्थानकातून एसटी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले दागिने हातचलाखीने चोरून नेले.

- Advertisement -

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 2 लाख रुपये किमतीचे 18 ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण, 40 हजार रुपयांची चार ग्रॅमची पिळ्याची अंगठी, 70 हजार रुपयांचे सात ग्रॅमची सोन्याचे इअररिंग, 40 हजार रुपयांची चार ग्रॅमची कानातील रिंग आणि लहान बाळाची 10 हजार रुपयांची सोन्याची एक ग्रॅमची बाळी असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कसाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सूर्यकांत डाके करीत आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : धर्म, अहंकार आणि सिंहस्थ

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकच्या पवित्र भूमीत येत्या ३१ ऑटोबरला होणारा सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नाही,...