Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमCrime News : महिलांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

Crime News : महिलांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील गंगा उद्यान परिसरातील मैदानात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या कार्यक्रमात चोरट्याने हात साफ केला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने काही महिलांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 53 हजार 820 रुपये किमतीचे सुमारे साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संगीता संजय आगलावे (वय 39, रा. श्रीराम नगर, कॉटेज कॉर्नर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 17 एप्रिल रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान मैत्रिणींसह गंगा उद्यान जवळील मैदानात भागवत कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. या गर्दीत चोरट्याने फिर्यादी महिला व त्यांच्या मैत्रिणींच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे सोन्याचे मोठे गंठण, 13 ग्रॅम वजनाचे लहान गंठण आणि 13 ग्रॅमचे मंगळसूत्र असा 1 लाख 53 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.

मिरावली बाबा पहाड परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची पोत चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंभाबाई रिकामे (वय 70, रा. राजापूर माठ, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी 17 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते संध्याकाळच्या दरम्यान मिरावली बाबा डोंगरावर दर्शनासाठी गेल्या होत्या.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Darshan Scam : मुक्काम कारागृहातच! कडलगांना सातव्या सुनावणीनंतरही दिलासा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांना व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आणि मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम...