Friday, January 23, 2026
Homeनगरसंगमनेरात मुख्याध्यापिकेस पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धमकी

संगमनेरात मुख्याध्यापिकेस पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धमकी

उपमुख्याध्यापकास अटक || शिक्षण वर्तुळात खळबळ

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेस तेथील उपमुख्याध्यापकाने पगार कपातीवरुन लक्ष्य करीत ‘पेट्रोल टाकून पेटवून देण्याची’ धमकी दिली आहे. हा उपमुख्याध्यापक वारंवार त्रासदायक प्रकार करत असल्याने वैतागलेल्या मुख्याध्यापिकेने संगमनेर शहर पोलिसांत धाव घेऊन संपूर्ण कथन केले. त्यावरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्यास प्रतिबंधात्मक कारवाई करीत अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सुखदेव संपत हासे (रा. राजापूर) हा शिक्षक शहरातील एका शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. मात्र, त्याची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. नेहमीच मनमानी करत असल्याने त्याचा पंचायत समितीच्या शिक्षणाधिकार्‍यांनी पगार कापला. यावरुन चिडचिड झाल्याने त्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस अन्य चार-पाच शिक्षकांसह अडवून दमबाजी केली. तुम्ही माझा पगार दिला नाही तर मी शाळेच्या गेटमध्येच पेट्रोल टाकून जाळील, तुम्हाला शाळेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली. या सततच्या त्रासाला वैतागून मुख्याध्यापिकेने शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

YouTube video player

मात्र, त्याच्यावर हा तिसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत अटक केली आहे. या घटनेने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...