Friday, June 21, 2024
Homeनगरअनैतिक संबंधावरून ब्लॅकमेल करणार्‍या युवकाचा नदीत ढकलून खून

अनैतिक संबंधावरून ब्लॅकमेल करणार्‍या युवकाचा नदीत ढकलून खून

शिरूर |प्रतिनिधी| Shirur

- Advertisement -

शिरूर (Shirur) तालुक्यातील न्हावरे (Navhare) येथे अनैतिक संबंधाबाबत (Immoral Relationship) इतरांना सांगेल अशी धमकी (Threat) देत वारंवार पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करणार्‍या 19 वर्षीय युवकाला मुळा-मुठा नदीच्या (Mula Mutha River) पुलावरून ढकलून देऊन खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी (Shirur Police) संशयितास जेरबंद केले आहे.

या तालुक्यातील महिला मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

बबलू उर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर (रा. न्हावरे, ता. शिरूर) असे खून करणार्‍या संशयित आरोपीचे नाव आहे. तर नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने (वय 19 रा. न्हावरा कारखाना ता. शिरूर जि. पुणे, मुळ रा. कीर्तनवाडी खरवंती ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे खून (Murder) झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्हावरे गावातील निंबाळकरवस्ती येथे राहणार्‍या बबलू उर्फ रविराज याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध (Woman Immoral Relationship) होते. हे मयत विठ्ठल आण्णा कीर्तने याला माहीत होते.

राळेगणसिद्धी खून प्रकरणातील संशयिताच्या आवळल्या मुसक्या

हा प्रकार तो इतर लोकांना सांगून बदनामी करेल अशी धमकी (Threat) देत तो बबलूला वारंवार पैशाची मागणी करून पैसे उकळत होता. तसेच मी महिलेसोबत पोलिसात जाऊन तुझ्यावर बलात्काराची केस दाखल करेल अशी धमकी देत होता. किर्तनेच्या सततच्या धमकीला (Threat) त्रासलेल्या बबलू निंबाळकर याने बुधवारी (दि.24) विठ्ठल र्किनेला ला स्वतःच्या (एमएच 12, एसपी 3924) या दुचाकी गाडीवर बसवून पारगाव (ता. दौंड) येथील मुळा मुठा नदीच्या (Mula Mutha River) पुलावर घेऊन गेला आणि त्याला पाण्यात ढकलून त्याचा खून (Murder) केला.

तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव

या घटनेनंतर नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने हा युवक बेपत्ता झाल्याने प्रथम शिरुर पोलीस स्टेशन (Shirur Police Station) येथे तो बेपत्ता झाल्याची खबर नोंदविण्यात आली होती. मात्र त्याचा मृतदेह मुळा मुठा नदीमध्ये सापडल्यानंतर शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित निंबाळकर याला अटक (Arrested) केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहेत.

गांजाची वाहतुक करणारे नेवासा, राहुरीचे युवक जेरबंद

- Advertisment -

ताज्या बातम्या