Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेशराजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे...

राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

दिल्ली | Delhi

देशात सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनमध्ये दंग होते तेव्हा दिल्लीत एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पाच मद्यधुंद तरूणांनी तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला ४ किमी फरफटत नेलं आहे. या अपघातात त्या मुलीचा मृत्यू झाला. (Delhi Accident)

- Advertisement -

दरम्यान या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. तसेच त्याच्या अंगावरून सर्व कपडे फाडले गेले. त्यानंतर मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

ज्या मुलीचा अपघात झाला तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. या २३ वर्षांच्या मुलीवर घराची जबाबदारी होती. सध्या ही तरूणी एका इव्हेंट कंपनीत काम करत होती. तिच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या आईला धक्का बसला आहे तसंच घरातल्या इतर सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिवसाढवळ्या महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेरात कैद

या मुलीचं घर दिल्लीतल्या अमन विहारमध्ये आहे. या मुलीच्या घरात आई आणि चार बहिणी आहेत. तसंच दोन लहान भाऊही आहेत. तिचा एक भाऊ १३ वर्षांचा तर दुसरा भाऊ ९ वर्षांचा आहे. या मुलीच्या वडिलांचा मृत्यू ८ वर्षांपूर्वी झाला. तर या मुलीच्या एका बहिणीचं लग्न झालं आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करणार्‍या बहिणीच्या नवर्‍यावर गोळ्या झाडल्या

- Advertisment -

ताज्या बातम्या