Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न

Crime News : महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न

आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, या खटल्यातील 28 वर्षीय महिला आणि आरोपी बाबासाहेब क्षिरसागर हे दोघे एकमेकांना परिचित होते. 24 जून 2024 रोजी फिर्यादी तिच्या माहेरी असताना आरोपीने तिला खोटे कारण सांगून फत्तेपूर येथील बस स्थानकावर बोलावून घेतले. तेथून बळजबरीने आडबाजूला नेऊन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिकार करत असताना आरोपीने चाकूने महिलेच्या मानेवर वार करत जखमी केले. तसेच अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेले. तू जर कुणाला काही सांगशील तर तुला जिवे ठार मारील, अशी धमकी दिली.

- Advertisement -

या प्रकरणी शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376,327, 504, 506अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर यांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवत आरोपीला अटक करून दोषारोपपत्र नेवासा येथील जिल्हा न्यायालयात दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. या मध्ये महिला, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने पुरावे, साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला भारतीय दंड विधान कलम 307 खाली दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे विष्णुदास भोर्डे यांनी युक्तिवाद केला तर त्यांना महिला पोलीस कर्मचारी स्वाती तडुलकर यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...