Monday, September 23, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

साकुर |वार्ताहर| Sakur

- Advertisement -

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील दरेवाडी (Darewadi) येथे भर दिवसा शेतात गवत कापत असताना महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला (Woman Leopard Attack) करत गंभीर जखमी (Injured) केल्याची घटना मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. शकुंतला शंकर मैड (वय 55) रा. दरेवाडी असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रूग्णालयात (Civil Hospital) हलविण्यात आले आहे.

सत्यजीत तांबेंना विखेंकडून ऑफर

याबाबत अधिक माहिती अशी की, दरेवाडी शिवारातील लांडगदरा येथे शकुंतला शंकर मैड या वास्तवास आहे. मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शकुंतला मैड घरापासून काही अंतरावरील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतावरील बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) अचानक शकुंतला मैड यांच्यावर हल्ला (Attack) केला. बिबट्याने शकुंतला यांच्या दोन्ही हाताला चावा घेत गंभीररीत्या जखमी (Injured) केले आहे. यावेळी शकुंतला यांनी जोरजोरात आरडा ओरडा केल्याने आजुबाजुचे नागरिक धावत आले. त्यानंतर बिबट्याने तेथूनच धूम ठोकली.

..तर विखे-थोरात संघर्ष संपेल !

शकुंतला यांना तातडीने जखमी (Injured) अवस्थेतच उपचारासाठी साकूर (Sakur) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यांवर उपचार करण्यात आले परंतू त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी जांभूळवाडी येथील सटवा राणबा खेमनर यांच्या बकरावर हल्ला करत ठार केले असून बिबट्याचा संचार भरदिवसा वाढत असून नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने (Forest Department) तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शिर्डी-मुंबई धावणार वंदे भारत एक्सप्रेसराहुरी विद्यापीठातील 50 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

- Advertisment -

ताज्या बातम्या