Monday, May 5, 2025
Homeक्राईमCrime News : सावेडी परिसरात महिलेचा विनयभंग

Crime News : सावेडी परिसरात महिलेचा विनयभंग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी परिसरातील पाईपलाईन रोड येथे 2 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारणार्‍या 29 वर्षीय महिलेस एकटक पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती बहिणीसोबत रात्री जेवणानंतर कॉलनीमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्यावेळी विनायक नन्नवरे (वय 32, रा. यशोदानगर कॉलनी, पाईपलाईन रस्ता) याने तिच्याकडे एकटक पाहून अश्लील हावभाव करत तिचा मानसिक छळ केला. त्याच्या हातातील प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी वस्तू काढून तो अश्लील हावभाव करत होता. त्यानंतर त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या महिलेने तात्काळ डायल 112 वर संपर्क साधत पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संपूर्ण माहिती घेत संशयित आरोपी विनायक नन्नवरे याला ताब्यात घेतले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Akole : राजूर येथील काविळ साथ रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा

0
राजूर, अकोले |प्रतिनिधी| Rajur| Akole राजूर येथे काविळचा प्रादूर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे...