Sunday, May 26, 2024
Homeनगरतिघांकडून महिलेचा विनयभंग

तिघांकडून महिलेचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर एमआयडीसी येथील स्मशानभूमीत दारू पित बसलेल्या तीन इसमांनी शनिवारी (दि.12 ऑगस्ट) सरपन आणण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल कळकुंबे, योगेश शिंगाडे, अभिजीत गायकवाड (पूर्ण नावे माहिती नाही, तिघे रा. नागापूर एमआयडीसी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नागापूर एमआयडीसी येथील एका हॉटेलचे सरपन आणण्यासाठी महिला आपल्या मुलीसह स्मशानभूमीत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये गेली होती. यावेळी तेथे दारू पिणार्‍या तिघांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यापैकी योगेश शिंगाडे याने लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तर तिघांनी मिळून महिलेला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरून तिघा संशयितांवर मारहाण, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या