Tuesday, October 6, 2026
Homeक्राईममनोरुग्ण महिलेवर नराधामाचा अत्याचार; गुन्हा दाखल

मनोरुग्ण महिलेवर नराधामाचा अत्याचार; गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील मनोरुग्ण असलेल्या महिलेवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि. 11 जून) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,मूळचा उत्तर प्रदेश येथील आणि सध्या पावबाकी रस्ता येथे राहण्यास असलेला प्रकाश रामनरेश निसाद याने इंदिरानगर परिसरातील पीडित 42 वर्षीय मनोरुग्ण महिलेला घरी एकटेच पाहून घरात प्रवेश केला.

- Advertisement -

त्यानंतर तिच्या वेडेपणाचा फायदा घेऊन अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार पीडित महिलेच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यावर पीडित महिलेच्या भावाने थेट संगमनेर शहर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश निसाद याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक फडोळ करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...