Saturday, August 15, 2026
HomeनगरCrime News : कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाला मारहाण

Crime News : कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाला मारहाण

सोन्याची अंगठी पळवली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पंचपीर चावडी परिसरात सरकारी कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करून एका अनोळखी व्यक्तीने तिची सोन्यांची अंगठी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका जुन्या गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी निता अडसरे या पंचपीर चावडी भागात गेल्या होत्या. त्या ठिकाणी तपास करत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दिशेने धावून आली.

- Advertisement -

त्या व्यक्तीने काही समजण्याच्या आत महिला पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याशी हुज्जत घालत, हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. अंगठी हिसकावून घेतल्यानंतर तो अनोळखी चोरटा घटनास्थळावरून पसार झाला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पीडित महिला कर्मचार्‍याने तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या