Saturday, April 26, 2025
Homeधुळेधुळ्यात महिलेवर बलात्कार, संशयित मजुराला पोलिस कोठडी

धुळ्यात महिलेवर बलात्कार, संशयित मजुराला पोलिस कोठडी

धुळे । dhule । प्रतिनिधी

येथील चित्तोड रोडवरील समता नगरातील महिलेवर (Woman) एकाने बलात्कार (raped) केला. ही धक्कादायक घटना काल रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी (police custody) देण्यात आली.

- Advertisement -

याबाबत समता नगरात राहणार्‍या पीडित 34 वर्षीय महिलेने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मजुरी काम करणारा राकेश मोहनलाल अग्रवाल (वय 35 रा. चक्करबर्डी रोड, भाईजी नगर, धुळे) हा दि. 4 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी जावून तिला शिवीगाळ व दमदाटी केली.

जीवे मारण्याची धमकी देेत तिला स्वयंपाक खोलीत नेले. तेथे जबरीने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी राकेश अग्रवाल याच्याविरोधात भादंवि कलम 376 (1), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आज दुपारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पीएसआय डी.डी.धनवटे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

0
नाशिक | Nashik नाशिकचा संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले मधुकर झेंडे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यसमयी ते 88 वर्षांचे होते. नाशिक...