Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

चांदवड । प्रतिनिधी Chandwad

तालुक्यातील राहुड येथील पाडगण मळा येथे घराबाहेर पोर्चमध्ये झोपलेल्या महिलेवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढविल्याने ती गंभीर जखमी झाली. या महिलेने आरडाओरड करताच कुटूंबीयांनी धाव घेतल्याने बिबट्याने पलायन केले. सुशिलाबाई उत्तम कहांडळ (55) हे त्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

कुटुंबातील सदस्या समवेत सदर महिला घराबाहेर पोर्चमध्ये झोपलेली असताना अचानक बिबट्याने हल्ला चढवला. अशा स्थितीत देखील महिलेने आरडाओरड केल्याने मुलासह कुटूंबीयांनी धाव घेत काठीच्या सहाय्याने बिबट्यास पिटाळून लावले. गुरुवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली असतांनाच परत बिबट्याचा दुसरा हल्ला झाल्याने तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जखमी सुशीलाबाई यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, शेतमजुर रामदास आहेर याच्यावर बिबट्याने हल्ला चढविलेल्या रायपूर, भडाणे परिसरात बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळून आलेल्या भागात वनविभागातर्फे बिबट्यास पकडण्यासाठी चार पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र, आज सायंकाळपर्यंत या पिंजर्‍यात बिबट्या अडकला नसल्याने शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण कायम होते.

 

ताज्या बातम्या

Nashik Fraud Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली दाम्पत्याला साडेचार लाखांचा गंडा;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणाऱ्या एका हायप्रोफाईल 'बंटी-बबली'चा कारनामा नाशिकमध्ये (Nashik)...