Friday, October 23, 2026
Homeक्राईमछेड काढत महिलेवर चाकूने वार

छेड काढत महिलेवर चाकूने वार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलाला घेण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या महिलेची छेड काढून तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात पीडित महिला जखमी झाली आहे. शुक्रवारी (दि. 24) पावणे सात वाजता बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. 25) दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मगन करवरे (रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता, नगर) व मनोज मगन करवरे (पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

- Advertisement -

फिर्यादी शुक्रवारी पावणे सात वाजता त्यांच्या मुलाला घेण्यासाठी गेल्या असता तेथे मुकेश उभा होता. त्याने फिर्यादीला अश्लिल भाषेत बोलून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. प्रतिकार केला असता त्याने खिशातून चाकू काढून हातावर मारून दुखापत केली. त्याचवेळी मनोजने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘तु जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली तर तुला जिवंत मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करून हौदात टाकून देईल’ अशी धमकी दिली. फिर्यादी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून दगड फेकून मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भास्कर गायकवाड करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डॉ. सुजय विखे पाटील यांचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी एकनाथ घोगरे यांची याचिका छत्रपती संभाजीनगर...