Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रPune Gangrape : संतापजनक! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक अत्याचार

Pune Gangrape : संतापजनक! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक अत्याचार

पुणे । Pune

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून घटणाऱ्या घटनापाहून चाललंय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. बस चालकाने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

- Advertisement -

या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची ही घटना आहे. मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या पीडित तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची ही घटना गुरुवारी (०३ ऑक्टोबर) रात्री घडली. याप्रकरणी तीन अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : स्टेटसला ठेवला आक्षेपार्ह व्हिडीओ

पीडित तरुणी मूळची परराज्यातील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गुरुवारी रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले.

तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती (एमएलसी) मध्यरात्री कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कार प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत.

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा युवक अटकेत

दरम्यान या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे भडकल्या असून त्यांनी संतापून ट्विट केलं आहे. ‘ पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...