Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

- Advertisement -

प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने महिला नेमक्या कुणाच्या प्रचारासाठी आल्या होत्या याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी फार कमी दिवस शिल्लक असताना सर्वच उमेदवार शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहेत. यातच साईबाबा नगर येथे एका एजंटच्या माध्यमातून उमेदवाराने तब्बल 65 महिलांना प्रचारासाठी बोलवले त्याकरिता प्रत्येक महिलेला चारशे रुपये असे मानधन देण्याचे ठरले होते. त्यानुसार सर्व महिला सकाळी दहा वाजता साईबाबा मंदिर पंडित नगर येथे जमल्या.

दरम्यान त्या उमेदवाराचा एजंट त्या ठिकाणी आला नाही. महिलांना दिवसभर अन्नपाण्या शिवाय ताठकळत ठेवण्यात आले. रात्रीचे आठ वाजून गेले तरी त्या उमेदवाराचा एजंट आला नाही. यावेळी एका महिलेने त्याला फोन करून त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचे सांगितले त्यावरून त्याने 12 हजार रुपये सदर महिलेच्या खात्यावर वर्ग करत त्याचा फोन स्विच ऑफ केला.

यावेळी अपेक्षेप्रमाणे पैसे न मिळाल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचे उपस्थितांनी व्हिडिओ काढले. दरम्यान सदरहू महिला नेमके कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्या होत्या याची परिसरात चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...