मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. यानंतर आता या महिलेसंबंधी तपास करण्यात आल्यानंतर महिलेची ओळख पटवण्यात आली आहे.
ही महिला दादरमधील एका सोसायटी सोसायटीतील रहिवासी आहे. धनश्री, असे या महिलेचे नाव असल्याचे समजते आहे. या महिलेने याआधी सोसायटीतही धुमाकूळ घातला होता. ज्याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. सोसायटीमधील राशिवाश्यांचे म्हणणे आहे की, ही महिला सोसायटीत सुद्धा चाकू घेऊन फिरते. याचे व्हिडिओही समोर आले आहेत. या महिलेची मानसिक स्थिती नीट नसल्याची माहिती आहे. तसेच मॅजिस्ट्रेट कोर्टाने महिलेला मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या महिलेचे आई वडिल काही वर्षापुर्वीच मरण पावले आहेत. बहीण लग्न करून निघालेली आहे. सदर महिलेने काल रात्री इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा तोडला. सीसीटीव्हीमार्फत महिलेची ओळख पटली आहे.
हे ही वाचा : Devendra Fadnavis : मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड, नेमकं काय घडलं?
तसेच, मला सलमान खानचा फोन नंबर द्या, लग्न करायचे आहे, अशी मागणी ही महिला करत असते. अनेक राजकीय नेत्यांना ही महिला सातत्याने फोन करून सलमानचा नंबर मागते. याआधीही महिलेने भाजपच्या कार्यालयात जाऊन धमकवले होते, त्याची रितसर तक्रार त्यावेळी करण्यात आली होती. याच महिलेचा आता एक व्हिडिओही समोर आला आहे. जो या महिलेच्या सोसायटीतीमधील आहे. या व्हिडिओत ही महिला तिच्या शेजारील घराच्या दारावर झाडूने प्रहार करताना दिसत आहे. तसेच ही महिला या व्हिडिओत खूपच रागात असल्याचे पाहायला मिळत आहे. धनश्री या घराच्या दाराच्या शेजारी भिंतीवर असलेल्या डोअर बेलवर झाडूने प्रहार करताना देखील दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड झाल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ती महिला कोण आहे तिची मागणी काय आहे, याची माहिती घेतली आहे. तिची काही व्यथा आहे का हे समजून घेऊ. विरोधक हताश आहेत, त्यांच्याकडे मुद्दे शिल्लक राहिले नाहीत, त्यांच्या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. कुणी जाणीवपूर्वक पाठवलेय का? हे समजून घेऊ. सुरक्षेच्या नावाखाली मंत्रालयाचं दार बंद करता येणार नाही’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा