Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदारू बंदीसाठी महिलांनी भरवला जनता दरबार

दारू बंदीसाठी महिलांनी भरवला जनता दरबार

बाऱ्हे वार्ताहर | वार्ताहर Barhe

- Advertisement -

तरुणाईने व्यसनाच्या आहारी न जाता चांगल्या मार्गाने पुढे जावे या करीता मनखेड, हेमाडपाडा, जाहुले, हस्ते रोंघाने आदी ग्रामपंचायतींकडून दारू बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता.अवैध दारू विक्रेते या ठरावाला जुमानत नसल्याने मनखेड, जाहुले, रोंघाने, हस्ते, या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील जवळपास एक हजार महिलांनी दि.२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अवैध दारू अड्ड्यावर पायी मोर्चा काढून जांभुळपाडा (दाभाडमाळ) परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

YouTube video player

याची गंभीर बाब लक्ष्यात घेऊन सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मनखेड येथे २७ सप्टेंबर झालेल्या महिलांकडून अवैध दारू बंदी विरोधाच्या जनता दरबारात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गीतेंनी कडक कार्यवाहीची हमी दिली, अवैध दारू विक्री करणाऱ्याना इशारा दिला. दरम्यान पोलिसांनी धडक कार्यवाही करत सात ते आठ हजाराचा मुद्धेमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.

या मोर्चात रोंघाने येथील उपसरपंच जयवंती वार्डे, भामा पाडवी, अनुसया पाडवी, हिरा गांगोडे, यमुनाबाई वार्डे यांच्यासह स्वयंम सहायता महिला बचत गटातील हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.यावेळी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम, करत मुलाचे लग्न २१ वर्ष तसेच मुलीचे लग्न १८ वर्षाखाली होऊ न देण्याची शपथ महिलांना व उपस्थितांना दिली.

पहिल्याच दिवशी झालेल्या धडक कार्यवाहीची दखल घेत परिसरात महिलांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशाच पोलीस अधिकाऱ्याची आमच्या बाऱ्हे विभागाला गरज होती,
जयराम भोये, उपसरपंच मनखेड

बाऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे करताना कोणीही दोषी आढळल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल.
प्रदीप गिते, सहा.पोलीस निरीक्षक ,पोलीस ठाणे बाऱ्हे

रोंघाने ग्रामपंचायत मध्ये २७ ऑगस्ट रोजी मनखेड येथे सर्व ग्रामपंचायतीनी दारू बंदीचा ठराव करूनही दारू विक्रेते जुमानत नसल्याने स्वयं सहायता बचत गटातील महिलांनी पुढाकार घेत दारू अड्ड्यावर मोर्चा काढत अवैध दारू अड्डे उद्धवस्त करून दारूच्या बाटल्या पोलिसांच्या स्वाधीन केल्या. याच्या अगोदर आम्हाला कोणत्याच पोलीस अधिकाऱ्यांनी दारू बंद करायला सहकार्य केले नसून आलेल्या नवीन पोलीस अधिकारी गिते यांचे कडून आशा आहे की दारू बंद करून आमचा प्रपंच सुखाने चालू देण्यात मदत करतील, अशी आशा आम्हा सगळ्या महिलांना वाटते.
भामाबाई पाडवी, महिला जांभुळपाडा (दा)

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...