Monday, May 4, 2026
HomeनगरSangamner : महिलांच्या स्वतंत्र रुग्णालयाबाबत शासन सकारात्मक - ना. अबिटकर

Sangamner : महिलांच्या स्वतंत्र रुग्णालयाबाबत शासन सकारात्मक – ना. अबिटकर

मुंबई येथे जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यात असणार्‍या विविध प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावे, ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे. तसेच नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयात स्त्री रुग्णालय सुरू करावे. या प्रमुख मागण्यांकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले असता महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यास राज्य शासन सकारात्मक असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ, आ. विठ्ठलराव लंघे आदींसह सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संगमनेर नगरपालिका परिसरातील कॉटेज हॉस्पिटलमध्ये 100 बेडचे सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त स्त्री रुग्णालय मंजूर करण्यात यावे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर व्हावे तर चंदनापुरी, धांदरफळ खुर्द आणि तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, पालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट अंतर्गत परवानगी देण्यासंदर्भात येणार्‍या अडचणींबद्दल तसेच इतरही आरोग्यविषयक महत्वाच्या गोष्टींवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.

संगमनेरची आरोग्य सुविधा बळकट व्हावी आणि नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत, आरोग्याच्या लढाईत कोणीही दुर्लक्षित राहू नये यासाठी माझा प्रयत्न आहे. लवकरच या सर्व मागण्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मागण्यांवर आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. या बैठकीत आरोग्य सेवा विभाग आयुक्त कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, रुग्णालय सहाय्यक संचालक सुनीता गोल्हाइत, वित्त अधिकारी डॉ. तुलसीदास सोळंके, नाशिकचे आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...