Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमबँकेत चोरी करणारी आंतरराज्यातील महिलांची टोळी जेरबंद

बँकेत चोरी करणारी आंतरराज्यातील महिलांची टोळी जेरबंद

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले (Akole) तालुक्यातील राजूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) ग्राहकांचे पैसे चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलांच्या आंतरराज्य टोळीला (Women Interstate Gang) राजूर पोलिसांनी पंढरपूरमधून अटक (Pandharpur Arrested) केली आहे. याबाबत राजूर पोलिसांकडून (Rajur Police) समजलेली अधिक माहिती अशी, की मधुकर नामदेव बांडे (वय 55, रा. शेंडी, ता. अकोले) यांनी बँकेतून भाताचे लागवडीकरीता 50 हजार रुपये काढले होते. त्यावेळी बँकेत गर्दी असल्याने त्यांनी जवळील बंद पिशवीत ठेवलेले पैसे बाहेर घेऊन जात असताना पिशवीला कोणीतरी अज्ञात चोरट्याने कट मारुन चोरुन नेले होते.

- Advertisement -

याप्रकरणी मधुकर बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीवरुन महिला पोहेकॉ. सुवर्णा शिंदे, पोना. रोहिणी वाडेकर, दिलीप डगळे, पोकॉ. गाडे यांच्या पथकाने पंढरपूर (Pandharpur) येथून रोख रक्कम 25 हजार रुपयांसह आरोपी बिंद्या अजय छायल (वय 27) व सुपमा गौतम छायल (वय 31, रा. कडिया सांसी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) यांना जेरबंद केले आहे. त्यांची सखोल चौकशी केली असता संपूर्ण देशात बॅग कापून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील इतर गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...