मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुलाखतीत अभिनेत्री कंगणा रनौतला देण्यात आलेल्या ‘वाय प्लस’ दर्जाच्या सुरक्षेवरून आणि मुंबई व मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मातोंडकर यांनी कंगणाला फटकारले होते. मात्र कंगनाने एका मुलाखतीत मातोंडकर यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली. यावरून कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा दर्शवत कंगनाला फटकारल आहे.
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी म्हंटले आहे की, “लज्जास्पद आहे कंगना रनौत. मी सहसा कुणावर कधीच भाष्य करत नाही. पण एक स्त्री म्हणून हे मला खूप त्रास देणारे आहे. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे उर्मिला मातोंडकरजी.” असे त्यांनी म्हंटले आहे.
उर्मिला मातोंडकर यांचे देखील संयमी प्रतिउत्तर
कंगनाने केलेल्या टीकेला उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत संयमी उत्तर दिले आहे. मातोंडकर यांनी म्हंटले आहे की, “प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है. शिवाजी महाराज अमर रहें.”
काय म्हंटली होती अभिनेत्री कंगना रनौत..
कंगना एका मुलाखती मध्ये म्हंटली होती की, “माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही. उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना?”, असे कंगनाने म्हटले होते