Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याRahul Gandhi : महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा पण ओबीसी समाजाला...; राहुल गांधींची...

Rahul Gandhi : महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा पण ओबीसी समाजाला…; राहुल गांधींची लोकसभेत मोठी मागणी

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवार (दि.१९) रोजी नव्या संसद भवनामध्ये (New Parliament Building) विशेष अधिवेशनात ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक मांडले. या विधेकाच्या माध्यमातून आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना (Women) ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या विधेयकाचे देशभरात महिलावर्गासह सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर आज या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु असून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी महिला आरक्षणाबाबत लोकसभेत भाष्य केले.

Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक लागू झाल्यास महाराष्ट्राचे राजकारण ‘असं’ बदलणार; जाणून घ्या सविस्तर

यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, आपल्याला लोकाकडून मतं मिळाली आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काम करणे आणि चांगले निर्णय घेणे गरजेचे आहे. महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) आमचा पाठिंबा आहे. लोकांना जास्तीत जास्त अधिकार मिळाले पाहिजे. महिला आरक्षणामध्ये एससी, एसटीसह ओबीसी आरक्षणची तरतूद केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

तसेच महिला आरक्षण देणे महत्त्वाचे पाऊल आहे. पण, त्यात अनेक कमतरता आहेत. ओबीसी महिलांना यात आरक्षण देण्यात आले नाही. तसेच महिलांना आरक्षण मिळण्यासाठी ७ ते ८ वर्ष वाट का पाहावी? त्यांना तात्काळ आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. आजच विधेयक पास करुन घेण्यात यावे. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. देशात जातींनुसार जनगणना (Census) घेण्यात यावी, अशी मागणीही राहुल गांधींनी यावेळी केली.

Supriya Sule : चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून सुप्रिया सुळे लोकसभेत भाजपवर बरसल्या

पुढे ते म्हणाले की, ओबीसींचा (OBC) आपल्या केंद्रीय संस्थांमध्ये किती प्रमाणात सहभाग आहे. याबाबत मी अभ्यास केला आहे. ज्या केंद्रीय संस्था आहेत, त्यात ९० सचिव प्रमुख पदावर आहेत. पण, या ९० सचिवांपैकी केवळ ३ ओबीसी सचिव आहेत. ९० लोक देशातील महत्त्वाच्या संस्था सांभाळतात. त्यातील ३ फक्त ओबीसी आहेत. यांच्याकडे फक्त ५ टक्के बजेटचे नियंत्रण आहे. याचा अर्थ भारताचे बजेट ४४ लाख कोटी असेल तर २.७ कोटी बजेटचे नियंत्रण यांच्याकडे आहे. ही असमानता आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या विधेयकातून लोकांच्या हाती सत्ता दिली जाणार असल्याचे म्हटले जाते. पण, ओबीसींना योग्य प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे ओबीसींचा हा अपमान असून शरमेची बाब आहे. ओबीसी आणि दलित समाजाला किती प्रतिनिधित्व दिले जात आहे? त्यांना योग्य हक्क मिळण्यासाठी जणगनणाना आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ते करण्यात यावी. महिलांना आजच आरक्षण द्यावे असंही राहुल गांधी यांनी म्हटले.

ICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण; पाहा Video

तसेच नवीन संसद भवन हे चांगले असून इथे बेंचवर मोर आहे. खुर्च्यांवर मोराची प्रतिमा आहे. पण देशाच्या राष्ट्रपती या महिला आहेत. त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन व्हायला हवे होते, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपला (BJP) टोला लगावला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बंद; व्यापारी संपावर, ‘हे’ आहे कारण

- Advertisment -

ताज्या बातम्या