Monday, May 27, 2024
Homeनाशिकबचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे

भरवसफाटा। वार्ताहर Bharvsphata

शासनाने महिलांसाठी नवनवीन योजना विकसित केल्या असून महिलांनी या योजनांचा लाभ घेत ग्रामीण भागात छोटे-छोटे उद्योग उभारावेत व स्वयंपूर्ण व्हावे. बँक ( Bank) त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करण्यास तयार आहे. अगदी घरगुती मसाले, पापड, ब्युटीपार्लर यासारखे व्यवसाय सुरू करून परिसरातील महिलांनाही बचतगटाच्या ( Mahila Bachat Gat ) माध्यमात सामावून घ्यावे असे प्रतिपादन महाबँक आर.सी.सी चे संचालक गणेश सरोदे यांनी केले आहे.

- Advertisement -

गोंडेगाव (ता.निफाड) येथे महा बँक व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपालिका सभागृहात महिला बचतगटांसाठी आयोजित प्रशिक्षणाप्रसंगी सरोदे बोलत होते. सात दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात महिलांना मसाले बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना सरोदे यांनी महिलांसाठी व महिला बचतगटांसाठी असणारे छोटे-मोठे लघु उद्योग, व्यवसाय वृद्धीची पद्धत, जनसंपर्क यावर, बनवलेला माल विक्रीची बाजारपेठ यावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात गोंडेगाव परिसरातील महिला बचतगटाच्या 45 महिलांनी सहभाग नोंदविला. महिलांना घरच्या घरी बनविण्यात येणार्‍या पदार्थाची व त्याची सोईनुसार विक्री तसेच तयार माल विक्रीची बाजारपेठ यांचीही माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात पापड, लोणचे, मसाला, ब्युटी पार्लर, कुरडया, शेवया, टेलरिंग आदींची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी सरपंच सायली निकम, उपसरपंच संजय दाते, प्रशिक्षक राजेंद्र पवार, प्रफुल्ल अहिरे, विकास भोसले, जयश्री दाते, दीपाली दाते, किर्ती दाते, सुवर्णा कटारे, मोनिका दाते, अश्विनी कांबळे, संगीता गवारे, साक्षी कांबळे, स्मिता कांबळे, स्वाती कांबळे, पल्लवी दाते आदींसह बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.

प्रशिक्षण घेतलेल्या सर्व महिलांना समारोपाच्या दिवशी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व बचतगटांच्या महिलांचे गोंडेगाव सरपंच सायली निकम यांचेसह ग्रा.पं.पदाधिकार्‍यांनी आभार मानले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी गोंडेगावच्या महिलांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या