केपटाऊन | Cape Town
आयसीसी महिला टी २० वर्ल्डकप (ICC Womens T20 World Cup) स्पर्धेच्या गुरुवारी केपटाऊन येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघावर ५ धावांनी रोमहर्षक विजय संपादन करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे…
आज शुक्रवारी इंग्लड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) संघांमध्ये सामना होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ६:३० वाजता करण्यात येणार आहे. या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विजेतेपदासाठी रंगणाऱ्या लढतीत दोन हात करण्याची संधी मिळणार आहे.
इंग्लंड संघाचे नेतृर्त्व एच नाईटकडे असणार आहे तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद सुने लुसकडे असणार आहे. आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा पराभव केला होता. आता इंग्लंड संघावर विजय संपादन करून आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपले स्थान निश्चित करण्यासाठी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ सज्ज झाला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? कथित बंगलो प्रकरणी गुन्हा दाखल
हा सामना केपटाउनच्या न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. साखळी फेरीतील दोन्ही संघाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास इंग्लंड संघाला विजयासाठी सर्वाधिक संधी आहे. साखळी सामन्यातील दोन्ही इंग्लंड संघाने ४ सामन्यात ४ विजय संपादन करून गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीवर नजर टाकल्यास २ सामन्यात संघाला विजयाची चव चाखता आली आहे.
तर २ सामन्यात संघाचा पराभव झाला आहे मात्र दोन्ही संघांसाठी जमेची बाजू म्हणजे दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन केला आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा १० गडी राखून पराभव केला आहे.
भारतीय वंशाचे ‘अजय बंगा’ जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, त्यांचे पुण्याशी आहे खास कनेक्शन
इंग्लंड संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे. अखेरच्या सामन्यातील विजयामुळे दोन्ही संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.
सलिल परांजपे, नाशिक.