Friday, February 6, 2026
Homeक्राईमअल्पवयीन मुलांची टोळी करून चोरी करणार्‍या दोन महिला गजाआड

अल्पवयीन मुलांची टोळी करून चोरी करणार्‍या दोन महिला गजाआड

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत चोरी (Theft) करणारे अल्पवयीन मुले तसेच त्यांना चोरी करायला लावणार्‍या दोन महिलांना राहुरी पोलिस (Rahuri Police) पथकाने विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन जेरबंद केले. तसेच त्यांच्याकडून दुचाकी व इतर वस्तू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. राहुरी पोलिस ठाण्यात दि. 25 जानेवारी 2025 रोजी शहरातून मोटरसायकल चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना एका गुप्त खबर्‍या मार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली कि, राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील एक महिला (Women) ही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोर्‍या करते. तसेच तिने सदर चोर्‍या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणलेले आहे व त्याच्याकडून ती बळजबरीने चोर्‍या करून घेते.

- Advertisement -

या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप ठाणगे, विजय नवले, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुर्‍हाडे, नदीम शेख, जयदीप बडे आदि पोलिस पथकाने आरोपी रेखा शरद पवार, विक्रांत संजय ससाने, अमिषा सिलीमान सय्यद, सर्व रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी, या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस पथकाने पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलास पळून आणल्याचेही निष्पन्न झाले. सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.

YouTube video player

अटक केलेल्या आरोपींना राहुरी येथील न्यायालया समोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी (Police Cell) सुनावली. या दरम्यान तपास करत असताना पोलिस पथकाने आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच दुचाक्या, गाड्यांचे टायर, हॉटेलमधील साहित्य व गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा एकूण 4 लाख 25 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करीत आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरातील इराणी गल्लीत नशेच्या गोळ्या

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरातील इराणी गल्ली येथे एका 24 वर्षीय महिलेस अवैधरित्या कोणतीही वैद्यकीय शिफारस नसताना नशेच्या नायट्रोझेपमच्या गुंगीकारक गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी श्रीरामपूर...