Friday, May 16, 2025
Homeनाशिकपाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महिलांचे आंदोलन

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महिलांचे आंदोलन

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

गेल्या दिड महिन्यांपासून पाथर्डी फाटा परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या (Water Supply Department) अनागोंदी कारभारामुळे कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा (Water supply) व खंडित पाणीपुरवठ्याने परिसरातील महिला वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून

याबाबत विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने परिसरातील महिलांनी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना निवेदन (memorandum) दिले.

पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांत नगर, नवले नगर, आर के लॉन्स परिसर, गणेश रो हाऊस, बलदेवा रो हाऊस येथील महिलांनी वारंवार महानगरपालिका नवीन नाशिक विभागीय कार्यालय (New Nashik Divisional Office) येथे कमी दाबाने व खंडित पाणीपुरवठा होत असल्याबाबत

तक्रार करून देखील महापालिकेतर्फे काहीही कारवाई करण्यात आली नसल्याने येथील महिलांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रभाग ३१ ची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रश्नी बडगुजर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी तिन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास परिसरातील महिलांतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी सुनंदा बिरादार, चंद्रकला मोरे, नूतन साळुंखे, दिपाली दलाल, पुनम जाधव, शिल्पा बेडके, सुलोचना सूर्यवंशी, मंगल आगाव, वैशाली बाविस्कर, खुशबू सिंग, मंदा शिंदे, युवराज धांडे, दीपिका धांडे, लताबाई धांडे, राणू गुप्ता, उत्कर्ष भोसले, शिवानी चौधरी, सुनंदा नाटे, शालिनी साळुंखे, सविता केनकर, सुरेखा भोळे, हर्षा भोळे, छाया खांडेकर, खुशबू वर्मा, सविता वानखेडे, कल्याणी हारदे, संध्या बाबर, जयश्री मढवई, पूजा बाकी, आशा जगताप, वंदना पाटणकर, मनीषा बेनके आदी महिला उपस्थित होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोदी

“आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे…”शरद पवार, बाळासाहेब...

0
मुंबई | Mumbai शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक 'नरकातला स्वर्ग'चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे...