Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : 'देशदुत'च्या प्रांंगणात महिला दिन आनंदात साजरा

Video : ‘देशदुत’च्या प्रांंगणात महिला दिन आनंदात साजरा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महिलांमध्ये (Women ) अनेक चांगले पैलु आहेत. त्यांना योग्य संधी मिळाली, भोवतालच्या प्रत्येकाने महिलांच्या आऩंदाचा विचार केेला.तर महिलाही कायम सुखी समाधानी व आनंदी राहुन कुटुंंबाचा आनंंद द्विगुणित केल्या शिवाय राहत नाही. असा सुर आज ‘देशदुत’च्या ( Deshdoot ) महिला दिना (Women’s Day )निमित्त आयोजित विशेष कट्यात व्यक्त झाला.

- Advertisement -

जागतिक महिला दिना निमित्त आज ‘देशदुत’च्या प्रांगणात ‘महिला दिन’ उत्साहाता साजरा झाला. त्या निमित्ताने विशेष कट्‌ट्यात महिलांच्या आयुष्यातील आनंद या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांशी दै. ‘देशदुत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांंनी संवाद साधला. त्यात डॉ, श्रध्दा साकळे, रोहिणी वाघ, श्रेया आढाव, सोनाली दाबक, शुभांगी तायडे, मिना केडीया, उज्वला बोधले, डॉ शेफाली अग्रवाल, श्रध्दा परदेशी आदी सहभागी झाल्या होत्या. प्रसिध्द् स्रिरोग तज्ञ डॉ. निवेदीता पवार यांंनीही कार्यक्रमाला हजेरी लाऊन समस्त महिलांना शुभेच्छा दिल्या.

या चर्चेत डॉ. साकळेे म्हणाल्या की, महीलांच्या प्रश्नांकडे फार कमी वेळा बघितले जाते. त्या स्वताःही फार लक्ष्य देत नाही. खुप त्रास वाढल्यावर डॉक्टरांाकडे जाण्याचे प्रमाण आजही मोठे आहे.

आहार तज्ञ श्रेया आढाव म्हणल्या , एक कर्ती स्त्री म्हणुन त्र्यांना जो संतुलीत आहार गरजेचा असतो ता सहसा मिळत नाही. त्याकडे त्यांनी लक्ष्य देणेे गरजेचे आहे.

सोनाली दाबक म्हणाल्या की, हेल्दी माईंड व हेल्दी बॉडी असेल तरच त्या आनंंदी राहु शकता. तरच इतराना आानंंदी ठेऊ शकता . त्यामुळे त्यांनी स्वताःकडे व कुटुंंबीयांनीही तिच्याकडे लश्र्य देणे काळाची गरज आहे.

मिना केडीयांंनी कौटुंंबिक जबाबदारी सांंभाळुन आता मुलांच्या कंपनीत संचालकपदाची जबाबदारी सांभाळालीे. त्यांनीही कुटुंंबाच्या आनंदातच आपला आनंद सामावला असल्याचे व त्यामुळेे स्वताःला कितीही कष्ट पडले तरी त्याचे दुःख होत नसल्यचे स्पष्ट केले.

श्रध्द परदेशी यांनीही महिलांना स्वत:साठी काही करण्याची इच्छा असते. मात्र मुल व कुटंबाची जबाबदारी सांभाळता साभाळता स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली.

या चर्चेत रोहिणी वाघ, , शुभांगी तायडे, उज्वला बोधले, डॉ शेफाली अग्रवाल यांनीही महिलांच्या आनंदासाठी विविध उपाय सुचविले. त्यां इतरांसाठी सर्व काही करतात. मात्र स्वताःसाठी त्ंयांनी वेळ काढला पाहीजे दिवसातील एक दीड तास तरी स्वता:साठी जगल्या पाहिजे कोणाला काही पदार्थे तयार करून खाऊ घालण्यात आनद मिळतो, कोणला वाचनात मिळेल, कोणाला स्वावलंंबी असल्याचा मिळत असेल तर त्यांंना तो मिळालाच पाहीजे. त्यांंच्यात आत्म् विश्‍वास फार महत्वाचा असतो.महिला स्वत: आनंंदी राहील्यातर पुढील पिढीतही आनदाचे बीज रोवले जाईल. त्यासाठी कुटुंबियानीही महिलांच्या आनंंदासाठी वातावरण निर्मिती केली पाहीजे. असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनंतर उपस्थित महीलांनी संगीत खुर्ची व क्रिकेट, या खेळांचाही भरभरुन आनंंद घेतला. आयोजित खेळांचे सूत्र संचालन वैशाली सोनार, गितीका सचदेव यांंनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या