Friday, September 20, 2024
HomeUncategorizedनाशिकमध्ये आज 'महिला सशक्तीकरण अभियान महाशिबिर'

नाशिकमध्ये आज ‘महिला सशक्तीकरण अभियान महाशिबिर’

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थितीत

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आज (दि.23) मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाशिबिर होणार आहे. या महाशिबिरासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी महाशिबिराची जय्यत तयारी केली आहे.

नाशिक येथील सिटीलिंक बस डेपोशेजारील तपोवन मैदान येथे होणार्‍या या महाशिबिरास जवळपास 50 हजार महिलांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या योजनांची लाभार्थींना थेट मदत/लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिबिराच्या आयोजनासाठीजिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक, महिला व बालविकास अशा संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन केले आहे. या शिबिराच्या ठिकाणी लाभार्थींंना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वतः शिबिर स्थळावरून झालेल्या तयारीची पाहणी करत आढावा घेतला आहे. यामध्ये मान्यवरांची बैठकव्यवस्था, वीजपुरवठा, जनरेटर्स, महाशिबिरास येणार्‍या महिला व अन्य लाभार्थींची वाहतूक व्यवस्था, कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, स्वच्छ पेयजल, पार्किंग व्यवस्था, मोबाईल स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, प्रथमोपचार, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहने, सूत्रसंचालन, सांस्कृतिक कार्यक्रम, एलईडी स्क्रीन्स आदीबाबत जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी आढावा घेतला आहे.

200 बसेसची व्यवस्था
मनपाकडून सुमारे 200 बसगाड्यांची लाडक्या बहिणींसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने बसमध्ये पाणी व नास्ता देण्यात येणार असल्याने प्रत्येक बसची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. चार ठिकाणी पार्कींगची सोय करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या